महराष्ट्रात १८८२ मध्ये पशुसंवर्धन विभागाची स्थापना करण्यात आली . पशुसंवर्धन विभाग हा जिल्हा परिषद , धाराशिव अंतर्गत येणारा महत्वाचा विभाग आहे. पशुपालन हे शेतीला प्रमुख जोड व्यवसाय म्हणून वर्षानुवर्षे ओळखला जातो. पशुप्रजनन, विविध रोगांपासून संरक्षण, पशु पोषण, पशु व्यवस्थापन व पशु वैरण व्यवस्थापन अश्या 5 पंचसुत्र हि पशुसंवर्धनाची प्रमुख अंगे आहेत. त्यातून ग्रामीण भागातील पशुपालकांचा आर्थिक विकास होण्यास पशुसंवर्धन विभागाचा मोलाचा वाटा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी पशुसंवर्धन विभाग महत्वाची भूमिका बजावत असून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यास मदत करत असतो. पशुसंवर्धन विषयक योजना 20 मे हा दिवस “पशुसंवर्धन दिन “ म्हणून साजरा करण्यात येतो. पशुसंवर्धन संबंधित विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असतो.
परिचय:
20 व्या पशुगणनेनुसार धाराशिव जिल्हयामध्ये 915771 पशुधन आहे . गाई म्हशी 550868, शेळ्या 239531, कुक्कुट 125372इतके पशुधन आहे. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत एकूण 95 पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. पैकी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 संख्या 40 व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 संख्या 55 कार्यरत आहेत. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत सघन कुक्कुट विकास गट धाराशिव हि संस्था कार्यरत आहे.पशुसंवर्धन विभाग धाराशिव अंतर्गत पशुसंवर्धनाची पंचसूत्री व पशुसंवर्धन विषयक विविध कार्यक्रम व योजना राबविण्यात येतात.
व्हिजन आणि मिशन:
पशुधनाचा शाश्वत विकास, पौष्टिक सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि उपजीविका आधारासाठी कुक्कुटपालन; आणि विशिष्ट प्राण्यांच्या रोगांसाठी रोगमुक्त क्षेत्र संकल्पनेला प्रोत्साहन देणे.
उद्दिष्टे कार्ये:
प्राण्यांच्या अनुवांशिक संसाधनांचे संवर्धन, स्थानिक जातींचे संवर्धन, पशुधनाचे संरक्षण, बळकटीकरण आणि सुधारणा, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि महिला आणि इतर उपेक्षित गटांसाठी उपजीविका आधार, पशुधन आणि कुक्कुट उत्पादनांचे उत्पादन, उत्पादकता आणि वापर.