परिचय
- या विभागामार्फत या जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पाणी पुरवठा अनुषंगिक सर्व कामे करण्यात येतात, सद्यस्थीतीत या विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला ५५ एलपीसीडी प्रमाणे शाश्वत पाणी पुरवठा केला जातो.
- अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी घेण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना.
- मा. आमदार / मा. खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमअंतर्गत पाणी पुरवठा योजना.
- ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम योजना अंतर्गत पाणी पुरवठा योजना.
- १५ वा वित्त आयोग बंधीत व आबांधीत मधून पाणी पुरवठा योजना.
- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे.
दृष्टी आणि कार्य
- जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रत्येक ग्रामस्थाना ५५ एल पी सी डी प्रमाणे शास्वत व पुढील येत्या ३० वर्षांपर्यंत पाणी पुरवठा करणे.
- अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी घेण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना.
- १५ वा वित्त आयोग बंधीत व अबंधीत मधून पाणी पुरवठा योजना करणे.
- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे.
- ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा योजना.
- अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या विकसाठी घेण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना.
उद्दिष्टे व कार्ये
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन पुर्नरचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. या नुसार ग्रामीण भागातील कुटुबांना सन 2024 पर्यंत “हर घर जल” प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्ता पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशन चे प्रमुख उददीष्ट आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील महत्त्वाची कामे
- जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करणे.
- पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित करणे तसेच पुढील काळात पाणी टंचाई भासू नये याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शिवकालीन पाणी साठवण योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेन्तर्गत उपयुक्त कामे प्रस्तावित करणे.
- राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे.
- राज्यातील ग्रामीण भागात(गावे/वाडया/वस्त्या) पाणी पुरवठा योजना राबविणे.