बंद

    जल जीवन मिशन

    • तारीख : 01/10/2025 - 30/06/2026

    जल जीवन मिशन

    केंद्र शासनाने दिनांक 25.12.2019 रोजी प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्र शासन देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” (एफएचटीसी-फंक्शनल घरगुती टॅप कनेक्शन) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे . सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्ये घरात वैयक्त‍िक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

    जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हयातील सर्व वाडया वस्त्यातील प्रत्येक कुटुंबाला टप्प्या-टप्प्याने वैयक्त‍िक नळाव्दारे पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे . याबाबत जल जीवन मिशन मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हयांनी जे वार्षिक कृती आराखडे तयार केले आहेत, त्यात अशा वैयक्त‍िक नळ जोडणी साठी सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) च्या कामाचा समावेश केला आहे. अशा गावांसाठी,ज्या योजना सुधारणात्मक पुन:जोडणी साठी(रेट्रोफिटिंग) प्रथम टप्प्यात घ्यावयाच्या आहेत, त्यांचे अंदाजपत्रक तयार करणे बाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहे.

    सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) ज्या योजनांचा संकल्पन कालावधी किंवा योजनेचे आयुष्य संपलेले नाही व ज्या योजनांमधुन सद्यस्थितीत पाणी पुरवठा सामुदायिक, सार्वजनिक नळाव्दारे होत आहे, अशा योजनांमधुन दरडोई दररोज 55 लिटर पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते.

    • अस्तित्वातील ज्या योजना दरडोई दररोज 55 लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी सक्षम आहेत किंवा, या योजनांमध्ये पंपिंग तास वाढवुन/पंपिंग मशिनरीमध्ये किरकोळ सुधारणा करुन दरडोई दररोज 55 लिटर पाणी देणे शक्य आहे, अशा योजनांमध्ये वैयक्तिक नळ जोडणी देणे या कामाचा समावेश सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) या शिर्षाखाली करण्यात यावा आणि वैयक्त‍िक नळ जोडणी देण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे.
    • वरील गावांमध्ये गावातील अंतर्गत वाढीव वितरण वाहिन्या, आवश्यक असल्यास त्या कामाचा समावेश देखील याच सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) मध्ये करण्यात यावा.

    पंधरावे वित्त आयोग

    केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी 50 टक्के बंधीत स्वरुपात ठेवला असुन त्याचा वापर मुख्यत: पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी करण्यात यावा अशा सुचना दिलेल्या आहेत. 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतींना वितरीत होणारा निधी हा ग्रामविकास विभागातर्फे वितरीत करण्यात येतो. ग्राम विकास विभागाने 15 व्या वित्त आयोगाचा निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्ण दि.29 जुन 2020 निर्गमित केला आहे.या निधीतील बंधीत निधी वितरीत करताना जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्यात यावा .

    पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रांमपंचायतींना देण्यात येणा-या निधी मधील, बंधीत स्वरुपातील निधी हा सद्यस्थितीत पाणी पुरवठयाच्या कामांसाठी प्राधान्याने वापरणे गरजेचे आहे. यास अनुसरुन पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणा-या निधी मधील, बंधीत स्वरुपातील निधी पुढील आदेश येईपर्यंत फक्त संबंधीत ग्रामपंचायतीने 100 टक्के कार्यात्मक घरगुती नळजोडणी (एफएचटीसी) देण्यासाठी वापरण्यात यावा, असे करताना खालील सुचनांचे पालन करण्यात येते.

    1. जी गावे जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) साठी कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर निवडण्यात आली आहे, त्यांची कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची कामे (एफएचटीसी) ग्रामपंचायत पातळीवर पुर्ण करावी. ग्राम विकास विभागाने दिलेले वित्त आयोगाचा निधी वापरासंबधीचे प्रशासकीय अधिकार ग्रामपंचायतीस आहेत त्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीस देता येईल, अशा कामांना तांत्रिक मान्यता देण्यास उप अभियंता, पाणी पुरवठा व स्वच्छता उपविभाग , जिल्हा परिषद हे सक्षम राहतील.
    2. ज्या गावांमध्ये अधिक कामे (उदा. स्त्रोत विकास, नवीन स्त्रोतांचा शोध, उर्ध्व/गुरुत्व वाहीन्या,पाण्याची टाकी बांधणे ई) करुन कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची कामे (एफएचटीसी) करावयाची आहेत. अशा गावांनी 15 वित्त आयोगातुन प्रथम 100 टक्के घरांना नळ जोडणीची कामे पुर्ण करावीत.

    राज्य मंत्रीमंडळाच्या दि.08/07/2020 रोजी झालेल्या बैठकीत राज्यात केंद्र शासन प्रणित जल जीवन मिशन राबविण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणी व्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन , गुणवत्ता पुर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सदर जल जीवन मिशन 50:50 टक्के केंद्र व राज्य हिश्याने राबविण्यात येईल.

    • कृती आराखडा
    • जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्म नळ जोडणी व्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता हि किमान भारतीलय दर्जा-BIS:10500 अशी असावी असे अपेक्षित केले आहे.
    • राज्यातील प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीव्दारे(एफएचटीसी-फंक्शनल घरगुती टॅप कनेक्शन) पाणी पुरवठा करण्यासाठी बेस लाईन सर्वेक्षण करुन पुढील 4 वर्षाचे नियोजन करण्यात यावे.
    • जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबा सन 2024 पर्यंत घरगुती नळ जोडणी व्दारे पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करुन दयावयाची आहे. यानुसार गाव कृती आराखडा (व्हीएपी), जिल्हा कृती आराखडा (डीएपी)तयार करावा. सदर कृती आराखडयामध्ये दयावयाच्या नियोजित घरगुती नळ जोडण्याचे व त्याकरीता आवश्यक असणा-या निधीचे त्रैमासिक च वार्षिक नियोजन याचा समावेश आहे.
    • जल जीवन मिशन ची अंमलबजावणी-

    जल जीवन मिशन मध्ये पुढील प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात येतो.

    • ज्या योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (एनआरडीडब्ल्यूपी) अंतर्गत सुरु आहेत, अशा योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) किमान 55 एलपीसीडी प्रमाणे करुन कार्यात्मक घरगुती जोडणी करणे. तसेच त्या गावांमध्ये स्टँड पोस्ट नळ पाणी पुरवठा योजना आहेत, अशा गावांमध्ये स्टँड पोस्ट पासुन प्रत्येक कुटुंबापर्यंत/घरापर्यंत घरगुती कार्यात्मक घरगुती नळ जोडणी देण्यासाठी पुर्वीच्या योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) करणे.
    • पुर्ण झालेल्या योजनांच्या बाबतीत 40 एलपीसीडी ऐवजी किमान 55 एलपीसीडी पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने अशा योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) करणे
    • ज्या गावांमध्ये पिण्यायोग्य मुबलक भुजल (किंवा अन्य पर्यायाव्दारे ) उपलब्ध आहे, अशा गावामध्ये स्वतं९ योजना घेणे.
    • ज्या गावांमध्ये मुबलक भुजल (किंवा अन्य पर्यायाव्दारे ) उपलब्ध आहे, मात्र पाण्याची गुणवत्ता योग्य नाही, अशा गावांमध्ये जल शुध्दीकरण प्रकल्पासह स्वतंत्र योजना घेणे.
    • ज्या गावांमध्ये पाण्याचे प्रमाणे कमी आहे, अशा गावांसाठी प्रादेशिक/अने गाव योजना घेणे.
    • आदिवासी भागात नळ पाणी पुरवठा सोय नसलेल्या आदिवासी गावे /वाडया/पाडे यांना कायमस्वरुपी पाणी पुरवठा करुन प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणी व्दारे पाणी पुरवठा करणे. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाडी इ, करिता सदर योजनेतुन नळ जोडणी देणे. तसेच एकाकी/ आदिवासी वाडी/पाडयांकरीता सौर उर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविणे.
    • दलित वस्तीमधील सर्व घरांना कार्यात्मक नळ जोडणी व्दारे पाणी पुरवठा देणे व योजनांच्या लाभार्थ्यांची स्वतंत्र माहिती ठेवणे.
    • लाभार्थी:

      ग्रामीण आणि दुर्गम भागातील दुष्काळग्रस्त गावे आणि गावे

      फायदे:

      ग्रामीण आणि दुर्गम भागातील दुष्काळग्रस्त गावे आणि गावे

      अर्ज कसा करावा

      ग्रामीण आणि दुर्गम भागातील दुष्काळग्रस्त गावे आणि गावे