जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत अनु. जाती पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम
योजनेचे स्वरूप :-
- प्रशिक्षण वर्ग कालावधी 3 दिवसाचा राहील.
- रु.1000/- प्रती लाभार्थी खर्चाच्या मर्यादेत सन 2024-2025 च्या उपलब्ध निधीतुन प्रशिक्षणार्थीची संख्या ठरविणेत यावी.
- लाभार्थ्याना सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष तांत्रिक कामाबाबत प्रक्षेत्रावरच प्रात्यक्षिक देण्यात यावे व प्रशिक्षणार्थी समजूनच त्यांचेकडुन काम करुन घ्यावे.संपुर्ण काम त्यांचेवर सोपवू नये.दुपारच्या सत्रात प्रक्षेतावरील गायी म्हशीचे व्यवस्थापन यामध्ये मुख्यात:संकरीत पैदाशीचे,तंत्रज्ञान,ऋतृचक्र,माज ओळखणे,कृत्रिम रेतन,गाभण गाई/म्हशींची निगा,जन्मलेल्या वासरांचे संगोपन,खाद्य-वैरणीचे प्रकार व उत्पादन तंत्रज्ञान,दुग्धस्पर्धा स्वच्छ दुग्धोत्पादन,जनावरांना होणारे रोग व त्यानुसार रोगप्रतिबंधक लसीकरण,औषधोपचार,सहकारी संस्थेचे सभासदत्व इ बाबतची माहिती द्यावी.
- शेळयामध्ये संकरीत पैदास,जन्मलेल्या करडाची जोपासना,नर विक्री बाबत बाजार व्यवस्था व शेळीपालन प्रकल्प अर्थशास्त्र या बाबतची माहिती द्यावी.
- प्रगतिशील शेतक-यांकडे सहल/बचत गटांना भेटी देऊन,त्यानुसार त्यांचेकडील जनावरांच्या जोपासनेबाबत प्रात्यक्षिक दाखवावे जवळच असलेली प्रक्षेत्रे दुधमहासंघ,शेळया मेंढयांचे प्रक्षेत्रे यांना भेटी देण्यात याव्यात.
लाभार्थी:
अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रर्वगातील सर्व लाभार्थी.
फायदे:
दुग्धव्यवसाय,शेळीपालन व कुक्कुट पालन या विषयी प्रशिक्षण.
अर्ज कसा करावा
जिल्हातील सर्व पशुवैद्यकिय दवाखाने व पशुधन विकास अधिकारी (वि) येथे अर्ज करण्यात यावेत.