बंद

    पाणी टंचाई निर्मुलन कार्यक्रम

    • तारीख : 01/10/2025 - 30/06/2026

    योजनेचे नाव- संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपयोजना जसे विंधन विहिरी घेणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, विहिर अधिग्रहण, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती इत्यादी

    कालावधी प्रारंभ- ऑक्टोबर ते जुन ( प्रति वर्ष)

    कालावधी प्रारंभ- जुन अखेर

    क्षेत्र- ग्रामीण व अतिदुर्गम भागातील टंचाईग्रस्त गाव व पाडे

    भूजल अधिनियमानुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने पर्जन्यमान व निरीक्षण विहीरीतील भूजल पातळीच्या अभ्यासावरून संभाव्य पाणी टंचाई अहवाल तयार करून मा. जिल्हाधिकारी यांना संभाव्य पाणी टंचाई क्षेत्र घोषित करण्यासाठी सादर करणे 3 फेबुवारी 1999 च्या शासन निर्णयाप्रमाणे तसेच 27 फेब्रूवारी 2008 व 25 आक्टोबर 2008 च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व ग्राम पंचायतीने गावातील परिस्थितीचा अभ्यास करून पाणी टंचाई आहे किंवा कसे याबाबत ठराव सादर करणे सदर ठरावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित करणे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जि.प. मार्फत सदर ठरावाची छाननी करून कालावधी निहाय,गावनिहाय, उपाययोजना निहाय संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करणे. संभाव्य पाणी टंचाई आराखडयास मा. जिल्हाधिकारी यांची मंजूरी घेणे.आराखडयातील समाविष्ट गावांचे भूवैज्ञानिक मार्फत सर्वेक्षण करून प्रपत्र ब मध्ये केलेल्या शिफारिशी प्रमाणे मा. जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मंजूरी घेण्यात येते. मा. जिल्हाधिकारी यांचे कडून प्रशासकीय मंजूरी मिळाल्यानतर उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

    फायदेपाणी पुरवठा

    लाभार्थी:

    क्षेत्र- ग्रामीण व अतिदुर्गम भागातील टंचाईग्रस्त गाव व पाडे

    फायदे:

    क्षेत्र- ग्रामीण व अतिदुर्गम भागातील टंचाईग्रस्त गाव व पाडे

    अर्ज कसा करावा

    क्षेत्र- ग्रामीण व अतिदुर्गम भागातील टंचाईग्रस्त गाव व पाडे