बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
योजनेचे उद्दीष्ट-
जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचावणे व त्यांना स्वयंपूर्ण करणे.
अनुज्ञेय लाभ –
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर रु. 400000/-, जुनी विहीर दुरुस्ती रु. 1,00,000/-, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण रु. 2,00,000/-, वीज जोडणी आकार रु. 20,000/-, ठिबक सिंचन संच रु 97,000/- (पुरक अनुदान) किंवा तुषार सिंचन संच रु.47,000/- (पुरक अनुदान), पंपसंच डिझेल/विद्युत-40,000/-, पीव्हीसी/एचडीपीई पाईप- 50,000/-, परसबाग-5000/-, इनवेल बोअरींग-40,000/-, सोलार पंप (विज जोडणी आकार व पंप संच ऐवजी) 50,000/-, विंधन विहिर -50,000/-, यंत्र सामग्री (बैल चलीत/ट्रॅक्टर चलीत औजारे)-50,000/- (पुरक अनुदान) असे पॅकेज स्वरूपात किंवा मागणी प्रमाणे घटकाचा लाभ देण्यात येईल.
लाभार्थी निवड निकष
- लाभार्थीहा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे.
- शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
- शेतकऱ्यांचे नावे जमिन धारणेचा7/12 दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांकडे आधार काडे असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते असावे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- नविन विहिरी बाबत रु.4 लाख अनुदान मर्यांदेपर्यंत विहिरीची खोली असावी.
- महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेय जल स्त्रोताच्या 500 मी. परीसरात नविन विहीर घेण्यास प्रतिबंध असल्यामुळे अस्तित्वातील पेय जल स्त्रोताच्या 500 मी. परीसरात सिंचन विहिर अनुज्ञेय नाही.
- नविन विहिर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास 20 वर्षानंतर जुनी विहिर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात येईल.
- शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या घटकाचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच इतर योजनेतर्गंत शेततळयाचा लाभ घेण्यात आलेल्या तसेच स्वखर्चाने शेततळे केलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुज्ञेय असेल.
- सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरणयापैकी एकाच घटकाचा लाभ देय राहील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेत स्थळ आहे. या संकेत स्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. सदर योजनेबाबत अधिक माहिती जाणुन घेणेसाठी आपल्या नजीकच्या पंचायत समितीतील कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
लाभार्थी:
जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील शेतकरी.
फायदे:
नवीन विहीर
अर्ज कसा करावा
योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेत स्थळ आहे. या संकेत स्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. सदर योजनेबाबत अधिक माहिती जाणुन घेणेसाठी आपल्या नजीकच्या पंचायत समितीतील कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.