बंद

    कुटुंब कल्याण कार्यक्रम

    • तारीख : 01/04/2015 -

    भारतात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम 1952 मध्ये सुरू करण्यात आला, आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा कार्यक्रम राबविण्यात येतो. लोकसंख्या कमी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच लाभार्थीच्या गरजेनुसार स्वेच्छेने कुटुंब नियोजन पद्धत स्वीकारणे व समाजाच्या गरजेनुसार सेवा देणे व जोडप्याला त्याच्या इच्छेनुसार हवे तेव्हा अपत्यप्राप्ती होऊ शकते या केंद्र शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार योजनांची अंमलबजावणी करण्यात येते आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत लाभार्थ्यांचे संतती नियमनाच्या उपलब्ध पद्धतीने विषयी समुपदेशन केले जाते ,त्यानुसार लाभार्थी उपलब्ध पद्धतीमधून योग्य पद्धतीची निवड करतो सध्या केंद्रशासन प्रसूती पश्चात कुटुंब नियोजन सेवावर अत्याधिक भर देत आहे
    कुटुंब कल्याण कार्यक्रम (तात्पुरत्या व कायमच्या पद्धती )कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या सेवांमध्ये कायमच्या पद्धती व तात्पुरत्या पद्धती असे दोन प्रकार आहेत.

    1. कायम पद्धतीमध्ये पुरुष व स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये टाक्याच्या व बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
    2. तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी प्रसुती पश्चातांबी गर्भनिरोधक गोळ्या निरोध व गर्भनिरोधक इंजेक्शन इत्यादी पद्धती आहेत.
    3. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर लाभार्थ्याला खालील प्रमाणे लाभ दिला जातो पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेनंतर रुपये 1100/- एवढा लाभ देण्यात येतो तर स्त्री नसबंदी शस्त्रक्रिये नंतर एस सी एस टी व बीपीएल लाभार्थ्याला रुपये 600/- एवढा लाभ देण्यात येतो व इतर लाभार्थीला 250/- रुपये एवढा लाभ देण्यात येतो.

    कुटुंब कल्याण नुकसान भरपाई योजना —
    या योजनेअंतर्गत कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर एखादे लाभार्थ्याचे शस्त्रक्रिया असफल होऊन पुन्हा गर्भधारणा राहिल्यास सदर लाभार्थ्यास रु,30000/- एवढा लाभ देण्यात येतो शस्त्रक्रिये दरम्यान गुंतागुंत झाल्यास रुपये 25,000/- च्या मर्यादित खर्च दिला जातो तर शस्त्रक्रिये दरम्यान अथवा शस्त्रक्रिये नंतर मृत्यू झाल्यास रुपये 2,00000 एवढा लाभ देण्यात येतो

    लाभार्थी:

    सर्व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आलेले लाभार्थी.

    फायदे:

    आर्थिक मोबदला रु. 250 (खुला प्रवर्ग) आणि रु.600 (एस टी ,एस.सी., बीपीएल)

    अर्ज कसा करावा

    आशा कार्यकर्ती , आरोग्य सेविका, आरोग्य सेवक.

    संचिका:

    कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लाभार्थी नमुना (3 MB)