परिचय– कृषि विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव
व्हिजन आणि मिशन –
कृषी विभाग हा धाराशिव जिल्हा परिषदेच्या एकूण 15 विभांगांपैकी एक विभाग आहे कृषी विकास अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख आहेत. विभाग मार्फत विविध राज्य पुरस्कृत, केंद्र पुरस्कृत व जिल्हा परिषद स्वनिधीतून कृषी विषयक विविध विकास योजना राबविल्या जातात.
उद्दिष्टे कार्ये मजकूर-
- शासकीय योजनांची अंमलबजावणी – राज्य पुरस्कृत, केंद्र पुरस्कृत व जिल्हा परिषद स्वनिधीतून कृषी विषयक विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्यातून शेतक-यांना डिबीटी तत्वावर विविध घटकाचा लाभ देणे.
- कृषी निविष्ठाचा पुरवठा व गुणवत्ता नियंत्रण- शेतक-यांना शेती साठी उत्तम दर्ज्याच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात व फसवणूक होयू नये म्हणून बियाणे, खते, किटक नाशके यांचे पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणेसाठी विभागमार्फत सनियंत्रण केले जाते.
- कृषी विस्तार – नविन कृषी तंत्रज्ञानाची जिल्हयातील शेतक-यांना माहिती देणे व तंत्रज्ञानाची प्रचार व प्रसिद्धी करणे.
- जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समिती सभेचे कामकाज पाहणे,
- कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामकाज पाहणे,