उद्दिष्टे
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत
- ६ वर्षा खालील गरीब लहान मुलांच्या आरोग्य आणि पोषणचा दर्जा वृध्दीगंत करणे
- लहान मुलांच्या सुयोग्य संतुलित मानसिक, शाररिक आणि सामाजिक विकासाचा पाया तयार करणे.
- लहान मुलांमधील आकस्मिक मुत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण आणि शाळा बाह्यतेला प्रतिबंध करणे.
- राज्यातील मुलांच्या विकासाच्या उद्देशाने विविध शासकीय उपक्रम आणि योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागामध्ये धोरण सुनिश्चिती आणि अंमलबजावणी करण्याकरिता समन्वय साधणे.
- राज्यातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मुल्यांची माहिती आणि प्रशिक्षण देणे जेणे करून मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या क्षमता वृध्दीगंत होतील.
- लहान मुलांच्या मातांना आणि गर्भवती महिलांना देखील पोष्टिक आहार पुरविणे.
कार्ये
योजनेतंर्गत लाभार्थींना पुरविण्यात येणाऱ्या 6 प्रमुख सेवा:
- पुरक पोषण आहार – पुरक पोषण आहार 6 महिने ते 6 वर्षे मुले,गरोदर स्त्रिया,स्तनदा माता यांना अंगणवाडी घरपोच पोषण आहार व गरम ताजा आहार दिला जातो.
- लसीकरण – या सेवेमध्ये अंगणवाडी मध्ये 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुले ,गरोदर माता,स्तनदा माता यांना आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी केंद्रात दिला जातो.
- आरोग्य तपासणी – या सेवेमध्ये अंगणवाडी मध्ये 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुले ,गरोदर माता,स्तनदा माता यांच्या 4 तपासण्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभागाच्या समन्वयाने अंगणवाडी केंद्रात केल्या जातात.
- संदर्भ आरोग्य सेवा – या सेंवेमध्ये तीव्र कमी वजनाची बालके,आजारी बालके,गरोदर व स्तनदा माता,या गरजेप्रमाणे उपचारार्थ जवळच्या उपकेंद्रात , प्राथमिक आरोग्य केंद्रात,ग्रामीण रुग्णालयात पाठवुन संदर्भ सेवा पुरविली जाते.
- पूर्व शालेय शिक्षण – या सेवेत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये भौतिक व सामाजिक विकास साधण्याचे दृष्टीने तसेच शालेय शिक्षणात गोडी निर्माण करण्याच्या दृष्टीने पुर्व शालेय शिक्षण देण्यात येते. यासाठी आकार अभयाक्रम निश्चित करण्यात आला आहे.
- पोषण आणि आरोग्य शिक्षण – या सेवेत 15 ते 45 वर्षे वयोगटातील किशोरी मुली,स्त्रियाना बालकांचा विकास साधण्याचे दृष्टीने पोषण आहार व आरोग्य विषयी आरोग्य शिक्षण देण्यात येते. यासाठी पोषण अभियानात दरमहादोन कार्यक्रम प्रत्येक अंगणवाडीत घेण्यात येतात.