बंद

    जननी -शिशु सुरक्षा कार्यक्रम

    • तारीख : 01/01/2015 -

    उद्देशः

    गरोदर मातेस व एक वर्षांखालील आजारी बालकास मिळणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे.

    मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करुन देऊन माता व बाल मृत्यू कमी करणे.

    कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सेवा-सुविधाः

    1. गरोदर मातेस व बाळंतपणानंतर 42 दिवसांपर्यंत पुढीलप्रमाणे मोफत सुविधा मिळतात.
    2. बाळंतपण सुविधा, आवश्यकतेनुसार सिझर शस्त्रक्रिया
    3. गरोदरपणातील व बाळंतपणानंतर आवश्यक औषधे व साहित्य,
    4. प्रयोगशाळेतील तपासण्या
    5. बाळंतपणानंतरच्या काळात मोफत पोषण आहार (नैसर्गिक प्रसूती 3 दिवस, सिझेरीयन प्रसूती- 7 दिवस)
    6. आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा
    7. आरोग्य मूलभूत उपचारांसाठी आवश्यकतेनुसार घर ते दवाखाना, एक दवाखाना ते दुसरा दवाखाना आणि दवाखाना ते घर अशी मोफत वाहतूक सेवा .

    एका वर्षापर्यंतच्या आजारी बालकास पुढीलप्रमाणे मोफत सुविधा देण्यात येतात.

    1. उपचारासाठी आवश्यक औषधे व साहित्य
    2. प्रयोगशाळेतील तपासण्या
    3. आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा
    4. आरोग्य मूलभूत उपचारांसाठी आवश्यकतेनुसार घर ते दवाखाना, एक दवाखाना ते दुसरा दवाखाना आणि दवाखाना ते घर अशी मोफत वाहतूक सेवा

    सेवा सुविधा मिळण्याचे ठिकाण:
    आरोग्य उपकेंद्र / प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / स्त्री रुग्णालय / जिल्हा रुग्णालय

    अधिक माहितीसाठी संपर्क व हेल्पलाईन क्र.:
    आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.

    जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा

    अधिक माहितीसाठी 102/108 या हेल्पलाईनवर कॉल करा.

    लाभार्थी:

    गरोदर मातेस व एक वर्षांखालील आजारी बालकास

    फायदे:

    मोफत वाहतूक सेवा, मोफत औषधउपचार व मोफत तपासण्या

    अर्ज कसा करावा

    आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.