जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र
या केंद्रात विविध तज्ञ डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, आणि पोषणतज्ज्ञ यांच्या सहकार्याने मुलांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक सेवा दिल्या जातात. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, वर्तनात्मक समुपदेशन, अपंगत्वाचे निदान आणि सहाय्यक साधनांच्या माध्यमातून मुलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. डीईआयसी मुलांच्या आरोग्यावर एकात्मिक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या आरोग्य समस्यांचे लवकर निदान व उपचार करून त्यांना भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी सक्षम करते.
4डी च्या माध्यमातून डीईआयसी चे कार्यक्षेत्र:
- जन्मजात दोष : उदा. हृदयविकार, ओठ फाटलेले, डोळ्यांचे दोष यांचे निदान व उपचार.
- पोषणाच्या कमतरता : उदा. अॅनिमिया, व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता यांवर लक्ष केंद्रित करणे.
- बालरोग : उदा. बालकांमधील संसर्गजन्य आणि नसंसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन.
- विकासात्मक विलंब (अपंगत्वासह विकासात्मक विलंब): उदा. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासात होणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणे.
डीईआयसी हे ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी आरोग्य सेवा प्रदान करणारे महत्त्वाचे केंद्र आहे.
लाभार्थी:
० ते १८ वर्ष वयोगटातील सर्व आजारी बालके.
फायदे:
पुनर्वसान थेरपी व शस्त्रक्रिया
अर्ज कसा करावा
सर्व शासकीय आरोग्य संस्था व आर बी एस के पथक मधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्याशी संपर्क करणे.