बंद

    दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम 100 टक्के अनुदानावर बियानांचे वाटप करणे)

    • तारीख : 01/01/2015 -

    योजनेचे स्वरूप :-

    1. या अंतर्गत वैरण बियाणाचा पुरवठा करतांना लाभार्थीकडे वैरण उत्पादनांसाठीस्वत: ची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.या कार्यक्रमांतर्गत ज्वारी,मका,बाजरी,बरसिन,लुसर्न,न्युट्रीफिड व इतर बियाणे तसेच नेपियर,यशवंत,जयवंत इ.सुधारित बहुवर्षिक गवत प्रजातींची ठोंबे वाटप करावीत.
    2. ज्या लाभार्थीकडे स्वत:ची किमान 3 ते 4 जनावरे आहेत अशा लाभार्थीना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.
    3. वैरण बियाण्यांचे वाटप करण्यापुर्वी लाभार्थ्याना वैरण पिकांच्या लागवडी बाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे.
    4. या कार्यक्रमांतर्गत कोणत्याही प्रवर्गातील शेतक-यांना लाभ घेता येईल.तसेच एका लाभार्थीस एका हंगामात एकदाच लाभ देण्यात यावा.

    https://ah.mahabms.com

    लाभार्थी:

    सर्वसाधारण प्रवर्गातील सर्व लाभार्थीनां.

    फायदे:

    प्रति लाभार्थी एक हेक्टरएकरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी 100 टक्के अनुदानावर रु.4000/-(अक्षरी रु.चार हजार मात्र) च्या मर्यादेत वैरणीच्या वियाणंचा /ठोंबाचा पुरवठा.

    अर्ज कसा करावा

    https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.