दुर्धर रोग पिडीताना अर्थसहाय्य योजना
शासन निर्णय क्र-एलएफसी -२००६ /प्र.क्र.४७७० /वित्त -३ मंत्रालय मुंबई ४०००३२ दि ०३ नोव्हेंबर २००६ नुसार जिल्हा परिषदांनी आपल्या स्वतःच्या निधीतून कॅन्सर ,हृदयरोग ,किडनी अशा दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येते .
शासन परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील रहिवाशी असलेल्या व दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या (कॅन्सर ,हृदयरोग ,किडनी) रुग्णांना रु १५००० /- ( अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त ) प्रती लाभार्थी मदत देण्यात येते .
या योजनेस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९९ (अ ) नुसार तांत्रिक मान्यता व कलम १२५ नुसार प्रसाकीय मान्यतेचे अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.
शासन निर्णय क्र-एलएफसी -२००६ /प्र.क्र.४७७० /वित्त -३ मंत्रालय मुंबई ४०००३२ दि ०३ नोव्हेंबर २००६ नुसार यादीमध्ये असलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णास मदत देण्यात येते.
लाभार्थी:
ग्रामीण भागातील रहिवाशी असलेल्या व दुर्धर रोगाने पिडीत असलेले रुग्ण
फायदे:
रु १५००० /- ( अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त ) प्रती लाभार्थी मदत देण्यात येते
अर्ज कसा करावा
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव येथे संपर्क करणे