बंद

    निक्षय पोषण योजना

    • तारीख : 01/04/2018 -

    निक्षय पोषण योजना

    सदरील योजना ही केंद्र शासनाची आहे

    सदरील योजना ही औषध उपचारावर असलेल्या क्षयरुगणासाठी आहे.
    उद्दिष्टे:
    औषध उपचारा बरोबरच क्षयरुग्णांना पोषक आहाराची आवश्यकता असते म्हणून शासनाने 2018 पासून निक्षय पोषण योजनेस सुरुवात केली दरमहा रुपये पाचशे याप्रमाणे औषध उपचार सुरू असेपर्यंत देण्यात येते नोव्हेंबर 2024 पासून हजार रुपये औषध उपचार सुरू असेपर्यंत देण्यात येत आहे.
    ट्रीटमेंट सपोर्टर
    क्षयरुग्णांला उपचार पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या ट्रीटमेंट सपोर्टर यांना क्षयरुग्णांनी उपचार पूर्ण केल्यानंतर डीएसटीबीसाठी एक हजार रुपये देण्यात येते तर डी आर टी बी साठी पाच हजार रुपये देण्यात येते .
    इन्फॉर्मल
    समाजातील कुठल्याही व्यक्तीने संस्थयीत क्षयरुग्णास दवाखान्यात रुग्ण संदर्भीत केल्यास व त्याचे क्षयरोगाचे निदान निश्चित झाल्यास सदर व्यक्तीस रुपये पाचशे रुपये प्रती क्षयरुग्ण देण्यात येते.

    खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी क्षयरुग्ण कळविल्यास रुपये पाचशे रुपये व क्षयरुग्णाने औषध उपचार पूर्ण केल्याचे कळविल्यास रुपये पाचशे रुपये असे एकूण हजार रुपये देण्यात येते.

    लाभार्थी:

    उपचारावर असलेल्या सर्व क्षयरुगणासाठी आहे.

    फायदे:

    डी. बी. टी. द्वारे पोषण आहारासाठी मानधन

    अर्ज कसा करावा

    सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैदकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करणे.