बंद

    प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.

    • तारीख : 01/01/2017 -

    प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या केंद्र शासन पुरस्‍कृत अत्‍यांतिक महत्‍वाकांक्षी योजना आहे. याद्वारे गरोदर मातांना त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या बॅंक खात्‍यामध्‍ये डायरेक्‍ट बेनिफिशअरी ट्रान्‍सफर पध्‍दतीने राज्‍यस्‍तरावरुन अनुदान वर्ग केले जाते. नव्‍या स्‍वरुपात १४ जुलै २०२२ च्‍या केंद्र शासनाच्‍या पत्रानुसार देशात लागू करण्‍यात आली आहे. पुर्वी केवळ पहिल्‍या गरोदरपणाच्‍या वेळी मिळणारी ही विस्‍तारीत करुन १ एप्रिल २०२२ नंतर आता दुसरे जीवंत अपत्‍य मुलगी जन्‍मल्‍यास असे लाभार्थी यांचा देखील या योजनेमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे.

    प्रधान मंञी मातृ वंदना योजनेतंर्गत पाञ लाभार्थी महिलेने विहीत अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्‍यानंतर तिला पहिल्‍या अपत्‍यासाठी रु. ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्‍त) ची रक्‍कम दोन हप्‍त्‍यांमध्‍ये तर दुसरे अपत्‍य मुलगी झाल्‍यास मुलीच्‍या जन्‍मानंतर एकाच टप्‍प्‍यात रु. ६०००/- (अक्षरी रु. सहा हजार फक्‍त) चा लाभ आधार संलग्‍न बॅक खात्‍यात किंवा पोस्‍ट ऑफिस मधील खात्‍यात (डीबीटी) व्‍दारे जमा केली जाईल.

    लाभार्थी:

    पहिले अपत्य असलेली गरोदर माता व दुसऱ्या वेळेस मुलगी झाली असलेले लाभार्थी

    फायदे:

    सकस आहार व अंशत: बुडीत मंजूरी साठी डी. बी. टी द्वारे लाभ आधार

    अर्ज कसा करावा

    जवळच्या शासकीय आरोग्य संस्था मधील कार्यरत आशा, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करावा.

    संचिका:

    आरोग्य-प्रधानमंत्री मातृवंदना अर्ज नमुना (617 KB)