महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
कालावधी प्रारंभ:- सन 2005 पासून आणि 1 एप्रिल 2008 कायदा लागू केला.
लाभार्थी :-वैयक्तिक लाभार्थ्यांच्या अभिसरण नियोजन प्रक्रियेत प्राधान्य दिलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल.
वैयक्तिक कामांचा लाभ देताना खालील प्रवर्गातील कुटुंबाना प्राधान्य दिले जाईल:
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- अधिसूचित जमाती
- दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे
- महिलां कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब
- शारीरिकदृष्ट्या अपंग प्रमुख कुटुंब
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- आयएवाय / पीएमएवाय अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी
वरील सर्व लाभार्थी संपल्यानंतर अल्प किंवा अल्पभूधारक शेतकर्यांच्या जमिनींवर कृषी कर्जमाफीमध्ये परिभाषित केल्यानुसार आणि कर्जमुक्ती योजना, 2008 या अटीच्या आधारे लाभार्थीने त्यांच्या जमिनीवर किंवा घराच्या जागेवर हाती घेतलेल्या कामावर कुटुंबातील किमान एक सदस्य काम करण्यास इच्छुक असणे आवश्यक आहे.
लाभार्थी:
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, अधिसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे, महिलां कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब, शारीरिकदृष्ट्या अपंग प्रमुख कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, आय ए वाय / पी. एम. ए. वाय अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी
फायदे:
मनरेगा अंतर्गत शासनाच्या विवध यंत्रणामार्फत 260 कामे अनुज्ञेय आहेत.
अर्ज कसा करावा
तालुक्याच्या ग्रामपंचायत/पंचायत समिती कार्यालय अर्ज उपलब्ध आहेत.