मागासवर्गीय महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिनकरिता अनूदान देणे
- योजना निधी: ₹20,00,000/-
- लोकवाटा: निरंक
- योजनेचा कालावधी: 2024-2025
- योजनेचे कार्यक्षेत्र: धाराशिव जिल्हयाचा ग्रामीण भाग
- योजनेचा उद्देश: मागासवर्गीय महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिन करिता अनुदान देऊन त्यांची आर्थिक उन्नती घडवून आणणे.
- योजनेच्या अटी व शर्ती व आवश्यक कागदपत्रे:
- लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा भज, विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय असावी. ( सक्षम अधिकारी यांचे जातीचा दाखला )
- लाभार्थीचे शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण असलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- लाभार्थी यांचे वय 18 ते 40 वयोगटातील असावे.
- मागासवर्गीय विधवा महिलांसाठी प्रथम प्राधान्य राहील.
- लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न ₹1,00,000/- पर्यंतचे असावे / लाभार्थी दारिद्ररेषेखालील असावा. ( तहसिलदार यांचे सन 2024-25 मध्ये सर्व मार्गाने मिळून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र )
- शासकीय / जिल्हा परिषद / पं. स. स्तरावरील योजनेचा लाभ घेतलेला नाही स्वघोषणापत्र.
- प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती मार्फत छाननी / तपासणी करूनच केवळ परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारण्यात येतील.
- निवड समाज कल्याण विषय समितीमध्ये करण्यात येईल.
- शा. नि. क्र डीबीटी 2016/प्रक्र.90/वित्त-9 दिनांक 09.01.17 नुसार लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- लाभार्थीचे आधार सिडींग केलेले राष्ट्रीयकृत बॅंकेतील खाते क्र./पासबुक झेरॉक्स.
- नुकताच काढलेला पासपोर्ट साईझचा फोटो अर्जावर लावणे आवश्यक.
- योजनेचा खर्च जि.प. उपकर 2225 समाज कल्याण योजना क्रमांक 101-K-21 या लेखाशिर्षाखाली मागासवर्गीय शेतकऱ्यांना औजार व उपकरणे पुरविणे या योजनेतून करण्यात येईल.
लाभार्थी:
मागासवर्गीय महिला.
फायदे:
मागासवर्गीय महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिनकरिता अनूदान देवून त्यांची आर्थिक उन्नती घडवुन आणने.