मागासवर्गीय 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्या 100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करणे.
- योजनेचे नाव: मागासवर्गीय 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करणे
- योजना निधी: ₹15,00,000/-
- लोकवाटा: निरंक
- योजनेचा कालावधी: 2024-25
- योजनेचे कार्यक्षेत्र: धाराशिव जिल्हयाचा ग्रामीण भाग
- योजनेचा उद्देश: मागासवर्गीय 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर सायकलसाठी अनुदान देऊन त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती घडवून तसेच शाळेत जाणे सुलभ व आकर्षक बनवणे.
- योजनेच्या अटी व शर्ती व आवश्यक कागदपत्रे:
- लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा भज, विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय असावा (शाळेच्या अभिलेखावरून शाळेच्या मुख्याध्यापकांचा स्वाक्षरीने जातीचा दाखला).
- वार्षिक उत्पन्न ₹100,000 किंवा ₹100,000/-च्या आत असल्याबाबत सन 2024-25 मध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार यांचे असणे आवश्यक.
- सन 2024-2025 मध्ये शिक्षण घेत असलेल्या शाळेची बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- शासकीय / जिल्हा परिषद / पं. स. स्तरावरील योजनेचा लाभ घेतलेला नाही स्वघोषणापत्र.
- प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मार्फत छाननी/तपासणी करूनच केवळ परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारण्यात येतील.
- लाभार्थीची निवड समाज कल्याण विषय समितीमध्ये करण्यात येईल.
- शा. नि. क्र डीबीटी 2016/प्रक्र.90/वित्त-9 दिनांक 09.01.17 नुसार लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- योजनेचा खर्च जि.प. उपकर 2225 समाज कल्याण योजना क्रमांक 101-K-21 या लेखाशिर्षाखाली मागासवर्गीय 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करणे या योजनेतून करण्यात येईल.
लाभार्थी:
मागासवर्गीय 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्या
फायदे:
100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करणे
अर्ज कसा करावा
गट शिक्षण अधिकारी कार्यालयास संपर्क करणे.