बंद

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम

    • तारीख : 01/01/2015 -

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ०१/0४/20१३ पासून लागू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आंगणवाडी व शालेय बालकांच्या / मुलांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधणेकरिता एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बालकांच्या / मुलांच्या आरोग्याची तपासणी, त्यांच्यात आढळणाऱ्या आजारावर वेळीच उपचार करुन पायबंध घालणे हा मुख्य उद्देश डोळयासमोर ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी होते. ज्यामध्ये ४ डी  म्हणजे, जन्मतः व्यंग,पोषणमूल्यांची कमतरत्ता शारीरिक व मानसीक विकासात्मक विलंब आजार यांचे निदान व उपचार देण्यात येतात.

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवून राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थी, अंगणवाडी स्तरावरील ० ते ६ वयोगटातील सर्व लाभार्थी तसेच शासकीय व निमशासकीय शाळेमधील ७ ते १८ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थी यांची तपासणी करणे हे आहे.

    खालीलप्रमाणे ० ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थीना आरोग्य विषयक पूर्णतः मोफत सेवा पुरविली जाते.

    1. आरोग्य विषयक समस्या / अडचणींचे निवारण
    2. योग्य ती संदर्भ सेवा
    3. किरकोळ व गंभीर आजारावर वैद्यकीय उपचार शल्य चिकित्सा / शस्त्रक्रिया
    4. पाठपुरवठा

    लाभार्थी:

    ० ते १८ वर्ष वयोगटातील बालके

    फायदे:

    आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया

    अर्ज कसा करावा

    सर्व अंगणवाडी केंद्र व शासकीय व निम शासकीय शाळा