विशेष घटक योजना (जिल्हा योजना) संकरित गाई पुरविणे व दुभत्या जनावरांना सकस खाद्याचा पुरवठा करणे (100 टक्के राज्य योजना)
योजनेचे स्वरूप :-
या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती लाभार्थीना 02 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करताना गाय गटासाठी 75 % म्हणजेच रु.1,17,638/- किंवा म्हैस गटासाठी रु.1,34,443/- शासकिय अनुदान अनुज्ञेय राहील.अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित 25 टक्के स्वहिस्सा स्वत: उभारावी लागेल.बँक/वित्तीय संस्थेकडुन कर्ज घेणा-या(अनु.जातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के बॅकेचे कर्ज) घेणा-या लाभार्थ्यास या योजने अंतर्गत् प्राधान्य देण्यात यावे.
लाभार्थी:
अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील सर्व लाभार्थी.
फायदे:
02 दुधाळ देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट वाटप करणे.
अर्ज कसा करावा
https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.